जळगाव मिरर | १७ मार्च २०२५
शहरातील पांडे चौक ते सिंधी काल झालेल्या कंजरवाडा हे परिसर जळगांव शहराच्या मध्यवर्ती भागात असून ह्या रस्त्यावरील वाहाने सतत जलद गतीने जात असतात या मार्गावर कंजरवाडा हे परिसर असून या भागात रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात.
सदर परिसरात गजबजलेला असतो विशेता रात्रीच्या वेळेस वाहाने किमान १००च्या स्पीड ने धावत असतात काल रात्री १० वाजता कंजरवाडा येथील सार्थक कपिल बागडे या ७ वर्षीय बालकाला अज्ञात दुचाकीस्वाराने पायघन हॉस्पिटल समोर जबर धडक देऊन मुलाला फरफटत नेत गंभीर जखमी केले मुलाला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत वरील परिस्थिती लक्षात घेता सदर ठिकाणी मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी सदर कंजरवाडा परिसरात लवकरात लवकर ४ ते ५ स्पीडब्रेकर टाकण्यात यावे या संदर्भात जळगांव मनपा आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांची आज भेट घेण्यात आली व आयुक्त साहेबांनी तात्काळ शहर अभियंता श्री मनीष अमृतकर साहेब यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले व शहर वाहतुक शाखा येथे देखील निवेदन दिले.
या प्रसंगी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे मुख्य सल्लागार,मोहन गारूंगे,सचिव राहुल नेतलेकर,खजिनदार योगेश बागडे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे,उमेश माछरेकर,संदीप गारूंगे,वीर दहियेकर,संजय मोती,निलेश बागडे,गणेश बागडे,सुमित माछरेकर,जितू नेतले,प्रितेश नेतले,प्रकाश तमायचे आदी समाजबांधव उपस्थित होते