जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आमच्या मुलाला वाईट व्यसन लावू नका त्याच्या पासून दूर रहा असे सांगितल्याचा राग आल्याने पिता पुत्रावर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना कापूसवाडी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापूसवाडी येथील रहिवासी गजानन आनंदा थोरात यांनी आरोपी सागर भास्कर सोनवणे, गजानन भास्कर सोनवणे व भास्कर सोनवणेंची पत्नी यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली असून घटनेच्या दिवशी सकाळचे सुमारास गजानन थोरात यांनी माझ्या मुलाला वाईट व्यसन लावू नका त्याचेपासून दूर रहा असे सांगितले असता. त्याचा राग मनात धरून सागर सोनवणे याने कमरेतून चाकू काढून फिर्यादीच्या पोटात खुपसला त्यांचा मुलगा सौरव थोरात हा बचावासाठी पुढे आला असता गजानन सोनवणे याने सागर सोनवणे यांच्या हातातून चाकू हिसकावून सौरवच्या पोटात हातावर व मानेवर वार करून त्याला सुद्धा गंभीर दुखापत केली व जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तर भास्करच्या पत्नीने दमदाटी करून आरोपींना प्रोत्साहन दिले याबाबत गजानन आनंदा थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सपोनि गणेश फड व कर्मचारी करत आहे