देशाच्या हवामानात बदल होत असल्याने यंदा जानेवारी पासून काही भागात पावसाची सुरुवात झाली होती. सध्या मार्च महिन्यात जरी उन असले तरी मराठवाड्यात पावसाने सुरुवात केली होती. त्यामुळे मार्च महिना अवकाळी पावसात गेला. राज्यात सर्वत्र पाऊस झाला. या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे अजूनही सुरु आहे.
आता आगामी तीन महिन्यातील यंदाचा उन्हाळा कसा असणार आहे? एप्रिल महिन्यात पावसाची शक्यता आहे का? या सर्व बाबींवर भारतीय हवामान खात्याने माहिती दिलीय. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. त्याचवेळी यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी केलेय.
जून ते ऑगस्ट दरम्यान ला-नीना सकारत्मक आहे. यामुळे मान्सूनला अडथळा नाही.परंतु एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात एप्रिलमध्ये ३९.२ मी.मी इतका पाऊस पडतो. एप्रिल महिन्यात दक्षिण भारत वगळता उर्वरित देशात सामान्य पाऊस पडेल.दक्षिण भारतात पाऊस सामान्य पेक्षा जास्त पाऊस राहील. देशात पावसासाठी ला नीना ही स्थिती चांगली आहे. जून ते ऑगस्ट पर्यंत ला नीना सकारत्मक आहे. मात्र मान्सूनचा अंदाज इतक्या लवकर देणे कठीण असल्याचे डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. हा अंदाज आम्ही 15 एप्रिल रोजी जाहीर करणार आहोत.