जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२३
देशभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत असतात पण काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात यातच नुकतेच एका प्रेमीयुगुलाने घरातून पळून जात चक्क धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी दिसते. या गर्दीत प्रियकर आपल्या प्रेयसीला काहीतरी समजावताना दिसत आहे. त्यानंतर तिने त्याला मिठी मारली, तो तिला बसायला सांगतो.
तरुणी ट्रेनच्या सीटवर बसल्यावर तरुणाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. शेजारच्या सीटवर बसलेली महिला प्रवासी तिच्याजवळ असलेले फुलांचे हार दोघांना देते. दोघेही हार घालत एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर मुलगी मुलाच्या पाया पडते. ट्रेनमधील गर्दीने भरलेला डबा त्यांच्या लग्नाचा प्रसंग पाहत असतो. यावेळी गर्दीत असलेले लोक दोघांच्या लग्नाला पाठिंबा देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आसनसोल ते जसीडीह मार्गावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दोघांचे अनेक जण अभिनंदन करत असून, काही जण नाराजी व्यक्त करत आहेत.