जळगाव मिरर | ३० मार्च २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढत असताना एका प्रेयसीचा थरारक घटना समोर आली आहे. हि घटना कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर येथे घडली आहे. लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून केला. प्रवासी बॅगेतून मृतदेह कारने निर्जनस्थळी आणून तो नष्ट करण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला. याप्रकरणी सुनीता सुभाष देवकाई (रा. खोपोली, जि. रायगड) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. गजेंद्र सुभाष पांडे (३८, रा. जिंतूर, जि. परभणी), असे खून झालेल्याचे नाव आहे. बुधवारच्या या खुनाचा उलगडा गुरुवारी रात्री झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र व सुनीता यांच्यात प्रेम होते. गजेंद्रने लग्नास नकार दिला घेतलेले पैसेही परत केले नाहीत. या रागापोटी त्यास खोपोली येथे झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. सुनीता व अमित पोटे (रा. सुळे, ता. आजरा) यांनी गजेंद्रचा गळा आवळून खून केला. मृतदेह निर्जनस्थळी नेताना आरोपींनी पेट्रोल, हरभऱ्यााचा कोंडा सोबत घेतला. गाडी मुमेवाडीजवळ थांबवून मृतदेह झुडुपाजवळ नेला. परिसरात हवालदार बाजीराव कांबळे, कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील गस्तीवर असताना हा प्रकार समोर आला.
