जळगाव मिरर । प्रतिनिधी
धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ (महिला राखीव) मधून माधुरी विनोद रोकडे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रभागातील मतदारांशी संवाद साधत घरोघरी जाऊन आशीर्वाद मागण्याचा मानस व्यक्त केला.
माधुरी रोकडे यांनी सांगितले की, त्या उच्चशिक्षित असून समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या पती विनोद रोकडे हेही पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभागातील नागरिकांच्या अडचणी, सुविधा आणि विकासकामांबाबत सातत्याने जनसंपर्क ठेऊन काम करण्याचा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांनी जाणिवपूर्वक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. “सुज्ञ मतदार योग्य उमेदवाराला न्याय देतील,” असेही त्यांनी म्हटले. प्रभाग क्रमांक ४ मध्ये महिला राखीव या गटातून विविध उमेदवारांकडूनही अर्ज दाखल होत आहेत. पुढील टप्प्यात अर्जांची छाननी व अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.




















