चोपडा : प्रतिनिधी
चोपडा येथे गणेश चतुर्थी निमित्ताने नुकतेच श्री संत सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.
अन्न हे परब्रम्ह आहे ! अन्नदान सर्व श्रेष्ठ दान… असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात ईश्वराचावास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते.यासाठीच श्री संत सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत सावता माळी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसादचा शहरासह समस्त पंचक्रोशीतील बांधवांनी लाभ घेतला. महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.