जळगाव मिरर | राजकीय विशेष
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून प्रत्येक पक्ष मतदार संघात तगडा उमेदवार देण्यासाठी मोठी चाचपणी करीत आहे. मात्र अनेक मतदार संघात नेहमी प्रमाणे होत असलेली लढतच यंदा देखील अनुभवायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील जळगाव ग्रामीण मतदार संघात दुहेरी रंगत दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे महायुतीच्या उमेदवाराला चीतपत करण्यासाठी उमेदवार मिळत नसल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगत आहे.
जळगाव जिल्हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीने जिल्ह्यात मोठे यश मिळविले आहे. या जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जरी वातावरण टाईट असले तरी निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीला चीतपट करण्यासाठी महाविकास आघाडीकडे तगडे उमेदवार नसल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात पिकू लागली आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघ हा नेहमीच स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा राहिला आहे. सन २००९ मध्ये या मतदार संघात शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता. हा विजय मिळविल्यानंतर गुलाबराव देवकर यांना मंत्रीपदाची लॉटरी देखील लागली होती. या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामे केली मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर हे सफ शेल फेल ठरले. २०१४ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पराभव शिवसेनेचा शिलेदार गुलाबराव पाटील यांनी केला. तेव्हा २०१६ मध्ये त्यांना मंत्री पदाची लॉटरी लागली तेव्हा मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात झपाट्याने कामे करून सन २०१९ मध्ये देखील आपला गड कायम ठेवला आता सन २०२४ मध्ये देखील ते विधानसभेच्या मैदानात उतरण्यास सज्ज आहे. मात्र यंदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विधानसभेच्या मैदानात चीतपट करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे एकच नाव समोर येत आहे. ते म्हणजे माजी मंत्री गुलाबराव देवकर.
महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना ?
जळगाव ग्रामीण मतदार संघात दोन गुलाबराव यांच्यामध्ये नेहमीच लढत होते, यात गुलाबराव पाटील दोन टर्मपासून बाजी मारत असले तरी देखील यंदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी महाविकास आघाडी नवा उमेदवार देणार कि, पुन्हा तेच चेहरे व तीच विजयाची यात्रा दिसेल हे मतदानाच्या निकालाच्या दिवशी दिसणार आहे.