
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६
शहरातील ‘इक्टिस स्मॉल फायनान्स बँक’ चे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या उत्तरप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. हे चोरटे पुन्हा एटीएम फोडण्यासाठी रेकी करीत जळगावात येताच या टोळीतील मोबीन आत्मज मिला (वय २८, रा. बेगी नाजर, सहारनपूर, उ.प्र.) व अब्दुल करीम नूर हसन (वय ५२, रा. तितरोद, सहारनपूर, उ.प्र.) या दोघ अट्टल चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरीत वापरलेली मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पोलन पेठ भागातील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्समधील इक्टिस बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चार चोरट्यांनी दि. ३ एप्रिल रोजी पळवून नेले होते. याप्रकरणी बँक मॅनेजर हरीश विजय गांधी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या गुन्ह्याचा तपास तपास सुरू असतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर या टोळीतील चोरटे हे पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी जळगाव शहरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दि. १४ एप्रिल रोजी मन्यारखेडा रोडवरून टोळीतील मोबीन आत्मज मिला व अब्दुल करीम नूर हसन या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वाल्टे, रविंद्र नरवाडे, सफौ अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, लक्ष्मण पाटील, सलीम तडवी, विनोद पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, सिद्धेश्वर डापकर, राहूल वानखेडे, प्रशांत परदेशी, छगन तायडे, हेमंत पाटील यांनी केली आहे.





















