
जळगाव मिरर | ६ मे २०२३
देशातील लव्ह जिहादवर आधारित हिंदू व ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून लव्ह जिहाद होणारे अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलीच्या जीवनावर आधारित सत्य ‘द केरल स्टोरी’ या चित्रपट असून या दिनांक ६ मे शनिवार रोजी जळगाव येथील नटवर थिएटरमध्ये PVR मधे तिन शो मधे ८०० महिलांना दाखवण्यात आला. यावेळी शहराचे आ.सुरेश भोळे यांच्यावतीने या चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. या चित्रपट पहाण्यासाठी महिला भगिनींचा व युवतीचा प्रचंड प्रतिसाद होता.
सदरील हा चित्रपट समाजात जनजागृती करण्यासाठी व लव्ह जिहाद बळी पडणाऱ्या व अत्याचार होणाऱ्या मुलीसाठी हा चित्रपट एक दूरगामी संदेश देईल असे आ.सुरेश भोळे यांनी सुध्दा हा चित्रपट पाहाताना सांगितले. याप्रसंगी महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी विशाल त्रिपाठी, माजी महापौर सीमाताई भोळे, महिला अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे व पदाधिकारी हे उपस्थित होते.
हा चित्रपट समाजात जनजागृतीसाठी करमुक्त करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंगट्टीवार यांना केलेले आहे. तरी जळगाव शहरातील सामाजिक संघटना महिला मंडळ यांनी हा चित्रपट पहाण्यासाठी प्रोत्साहन व आवाहन करावे. तसेज कॉलेजच्या मुलीने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे. आज व उद्या दि ७ मे रोजी १८ वर्ष असलेल्या फक्त मुलीसाठी चित्रपटाचा आ.राजु मामा याच्यातर्फे फ्रि दाखविण्यात येणार आहे असे आवाहन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.






















