जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
रस्त्यात लहान मुले खेळत असल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा होवून हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाकडून लोखंडी रॉड आणि विटाचा वापर करून एकमेकांना दुखापत केली. ही घटना सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रस्त्यावर लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. यात पहिल्या गटातील अबरार हमीद खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून अरार खाटील व त्यांचा मित्र फारूख शेख उर्फ पादू, सलमान उर्फ चरबी, समीर शेख सलिम सर्व रा. पिंप्राळा यांना लक्ष्मी थोरात, दिलीप थोरात, कन्हैय्या अहिर सर्व रा. पिंप्राळा हुडको यांनी शिवीगाळ करत लाथाबक्क्यांनी मारहाण केली, तर यातील लक्षमी थोरात हिने हाता विट उचलून अबरार खाटीक यांच्या डोक्यात टाकून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटातील दिलीप फकीरा थोरात (वय ३२ रा. पिंप्राळा हुडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लहान मुले खेळत असल्याच्या रागातून वाद होवून अबरार हमी खाटीक उर्फ चिरक्या, फारूख शेख उर्फ पादू, सलमान उर्फ चरबी, समीर शेख सलिम सर्व रा. पिंप्राळा यांनी दिलीप थोरात व त्यांचे शालक कन्हैय्या अहिर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर यातील अबरार याने हातात लोखंडी रॉड घेवून कन्हैय्या याच्या डोक्यात टाकल्याने गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकुण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.