• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश 

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 21, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर | २१ मे २०२५
जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. २१ रोजी सकाळी १० वाजता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विशेष म्हणजे या दोन दिवसात प्रदर्शनावेळी आंब्यापासून तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद ‘देशी ब्लिस’ येथे घेता येणार आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (JISL) या आघाडीच्या कृषी कंपनीकडून आंबा उत्पादनक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. आंब्याच्या उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उच्च घनता व अतिउच्च घनता लागवड पद्धती, ठिबक सिंचन व खतसिंचनाचा वापर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग यशस्वी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे कंपनीकडून भव्य ‘जैन आंबा प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातून आणलेले आणि जैन इरिगेशनने स्वतः विकसित केलेले १५० पेक्षा अधिक आंबा वाण / जनुकप्रकार प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये १० विदेशी व ३० नवे संकरित वाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व वाण जैन हिल्स येथील बागायत प्रयोगशाळांमध्येच पिकवलेले आहेत.
जैन इरिगेशनच्या संग्रहात एकूण १६० वाणांचे संकलन आहे, त्यापैकी ८० वाणांचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. तसेच, संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ८०० हून अधिक संकरित वाणांपैकी ३० वाणांचे परीक्षणासह सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काही वाणांचे फळ १ किलोपर्यंत वजनाचे, काही वाण अतिशय गोड चव असलेले, तर काही लालसर किंवा गडद पिवळ्या रंगात लाल छटा असलेले आहेत, जे अत्यंत स्वादिष्ट, देखणे व आकर्षक आहेत.
विदेशी वाणांमध्ये ऑस्ट्रेलियाचे किंगस्टन प्राईड, पामेर, ऑस्टिन, फिलिपाईन्सचा कॉरोबो, अमेरिकेचे केंट व टॉमी अटकिन्स, थायलंडचा किंगफॉन, आणि इस्राईलचा माया यांचा समावेश आहे. विविध नावाजलेल्या संस्थांनी विकसित केलेल्या रत्ना, मल्लिका, सोनपरी यांसारखे दर्जेदार वाण देखील प्रदर्शनात आकर्षण ठरू शकतील. या प्रदर्शनात केवळ विविध आंबा वाण पाहण्यासाठीच नव्हे तर आंबा क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे सविस्तर माहिती मिळवण्याची संधीही मिळणार आहे. जैन इरिगेशनच्या या उपक्रमामुळे शेतकरी, बागायतदार, संशोधक तसेच आंबा रसिक यांना आंबा उत्पादनाच्या नव्या वाटा व शक्यता समजून घेता येणार आहेत. ‘मँगो फिस्टा’ प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन  शिरसोली रोडवर असलेल्या गौराई ग्रामोद्योग मॉलतर्फे केले आहे.

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group