जळगाव मिरर / १४ मार्च २०२३ ।
मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन तर्फे भारतरत्न मौलाना आझाद पुरस्कार २०२२/२३ प्रदान करण्यात आले. यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
यात सामाजिक पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नारीशक्ती बहुद्देशीय संस्था अध्यक्ष मनिषा किशोर पाटील यांना देखील मान्यवर अध्यक्ष श्री मनोजकुमार पाटील संस्था अध्यक्ष श्री स्वामी समर्थ संस्था, महापौर जयश्रीताई महाजन, जळगाव आमदार राजुमामा भोळे , जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री विजयसिंह परदेशी, अब्दुल करीम सालार इकरा संस्था अध्यक्ष, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख , नोबल इंटरनॅशनल स्कूल संचालिका सौ अर्चना सुर्यवंशी, प्रतिक्षा पाटील संचालिका श्री स्वामी समर्थ संस्था जळगाव, जमील देशपांडे अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान,महिला परिषद अध्यक्ष निवेदिता ताठे, समाजसेविका भारती म्हस्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अल्पावधितच प्रेरणादायी कार्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.