जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे घेत असून सभेचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आता जळगाव जिल्ह्यात देखील मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्याची निश्चित झाले आहे.
जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा व्हावी, यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर मराठा समाजाचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. या वेळी शिष्टमंडळाला जरांगे पाटील यांनी ४ डिसेंबरला जळगावात येण्याचे आश्वासन दिले.
या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जळगावातील सभेसंदर्भात पद्मालय विश्रामगृहात रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीला सकल मराठा समाजाच्या प्रतिभा शिंदे, प्रमोद बळीराम पाटील, राम पवार, भीमराव मराठे, रवी देशमुख, आनंदराव मराठे, गोपाल दर्जी, नीलेश पाटील, दिलीप पोकळे, श्रीकृष्ण मेंगडे, प्रफुल्ल पाटील, हरीश देशमुख, राजेंद्र शिंदे, प्रा. राजेंद्र देशमुख, अभिजित पाटील, कुंदन सूर्यवंशी, उमेश आठरे, आकाश हिवाळे, सचिन वाघ, विशाल देशमुख, भरत कर्डिले, सचिन साळुंखे, गजानन रायते, दुर्वेश पाटील, प्रा. एन. डी. पाटील, सुधीर कोकाटे, कुणाल साळुंखे, महेश पवार, अजय चोरट, जयेश इंगोले, सोनू पाटील, पीयूष पाटील, संतोष वाघ, विजय बांदल, सचिन देसाई, निशांत काटकर, ज्ञानेश्वर मस्के, विनोद मराठे आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.