
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे व शरद पवार यांच्या गटातील अनेक नेत्यावर अनेक कारवाई सुरु असतांना नुकतेच पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे रोहित पवार उद्या बुधवारी ईडी कार्यालयात दाखल होणार आहे. या ईडी चौकशीआधी रोहित पवारांनी मोठं विधान केलं आहे. ‘मराठी माणस कधी शांत बसत नाहीत, मराठी माणसं कधी पळून जात नाहीत, असं विधान रोहित पवारांनी केलं आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘उद्या शरद पवार, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कार्यालयात असतील. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, उद्या गर्दी करू नये. ईडीची कारवाई सुरु झाली म्हणजे इलेक्शन जवळ आलं आहे. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक आणि माझ्या कारखान्यासंदर्भातील केस थोडी सुरक्षित आहे’.
‘या केसमध्ये माझं नाव आहे. मी चूक केलेली नाही. मी माझ्या बाजूने लढेल. यातून मी बाहेर पडेल. मी एकटा नाही. पण या सर्वांना यातून बाहेर काढेन. ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत आहेत. राजकीय द्वेषातून कारवाई करण्याचा प्रयत्न केला असेल तर सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल’, असं रोहित पवार म्हणाले. ‘लोकशाही आणि कोणाचा आवाज दाबण्याचा यंत्रणेचा वापर केला जात असेल तर, मराठी माणसं कधी शांत बसणारे नाहीत. मराठी माणसं कधीही पळून जात नाहीत. मी लढत राहणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना मी पूर्णपणे सहकार्य करेल. मुंबईत उद्या कोणी गर्दी करू नये. उद्या 24 तारखेला मी ईडी कार्यालयात जाणार आहे, असे ते म्हणाले.