जळगाव मिरर | २ जानेवारी २०२४
शहरातील शाहूनगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावर एमडी अमली पदार्थ सेवन करणाऱ्या शाहरुख सिराज भिस्ती (वय २८, रा. शाहूनगर) याच्यावर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई डिवायएसपींच्या पथकासह शहर पोलिसांनी संयुक्त रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास केली. त्याच्या कडून ३ हजार रुपये किमतीचे एमडी आमली पदार्थ हस्तगत केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात एक तरुण हा एमडी या अमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता छापा टाकून संशयित शाहरुख सिराज भिस्ती याला ताब्यात घेतले. त्याच्या झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ३ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम एमडी आमली पदार्थ आढळून आले असून ते पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख शिराज भिस्ती याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाची कारवाई
ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपविभागीय पोलीस विभागातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्या पथकाने केली आहे.