
जळगाव मिरर / १ मार्च २०२३
शहरातील पिंप्राळा परिसरातील गट नंबर 277/2 मधील सोनी नगरातिल एका रहिवासीने गटार बंद केल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरासमोर घाण पाण्याचे डबके साचल्याने परिसरातील महिलांनी मनपाचे उपायक्त गणेश चाटे यांच्याकडे समस्यांचा पाढा सांगितला व त्वरित गटारीचे सांडपाण्याचा निचरा करण्यात यावा.
तरी पण समस्या कायम असल्याने दि.१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आयुक्त विद्या गायकवाड यांची भेट घेण्यासाठी महिला गेल्या असता भेट झाली नाही.
मनपाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्याशी अजून हि समस्या कायम असून अजुन किती दिवस त्रास सहन करावा लागेल असा संताप व्यक्त केल्याने सकाळी 10 वाजता येतो व समस्याचा निवारण करण्याचे आश्वासन दिले. सोनी नगरातील एका रहिवासीने गटार बंद केल्याने गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून नगरिकांच्या घरासमोर पाणी साचून सेवाळे तयार होत आहे.त्यामुळे सर्वत्र दुर्गधि पसरल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सांडपाण्याची विल्हेवाट त्वरित करण्यात यावी यासाठी परिसरातिल् महिला मनपाच्या आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यासाठी आले असता मिटिंग सुरु आहे तुम्ही उपायुक्त यांच्याकडे निवेदन द्यावे असे मनपाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याने उपायुक्त यांची भेट घेऊन आपबिती सांगितली.
त्यानंतर येत्या दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन उपयुक्तांनी दिले होते.मात्र समस्या कायम असल्याने पुन्हा महिला मनपात येऊन मनपाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्याशी चर्चा करून समस्या सोडवावी. यावेळी मनपात निता पाटील, संगिता भालेराव, प्रियंका निकुंभ, माधुरी येवले, सोनाली जाधव, आदि महिलांची उपस्थिती होती. निवेदनावर शरद पाटील, ज्ञानेश्वर ताडे, विजय चव्हाण, मयूर भालेराव, मुकुंदा निकुंभ, विठ्ठल जाधव, भेयासाहेब बोरसे, नरेश बागडे, नारायण येवले, सरदार राजपूत, यशवंत पाटील, देविदास पाटील यांच्या सह निवेदनात परिसरातील नागरिकांच्या सह्या निवेदनावर आहेत.




















