जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीतर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांसाठी पारितोषिक योजना जाहीर करण्यात आली आहे. पतपेढी तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. तरी मार्च २०२३ या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या सभासदांच्या पाल्यास इयत्ता १० वी १२ वी मध्ये ८० टक्के टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत.
तसेच पदवी (बी.ए/बी. कॉम./बी.एस्सी.) मध्ये ७० टक्के पेक्षा जास्त गुण, पदव्युत्तर (एम.ए/ एम. कॉम./एम.एस्सी.) मध्ये ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तसेच शासनमान्य डिग्री, डिप्लोमा या परिक्षेत उत्तीर्ण झालेले असतील तसेच जे संस्थेचे सभासद यांनी डिग्री, डिप्लोमा व इतर तत्सम परीक्षा उत्तीर्ण झाले असतील ते व राज्यस्तरीय खेळाडू म्हणुन विशेष प्राविण्य प्राप्त केलेले असेल अशा सभासदांनी अर्जासह गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत पतपेढीच्या कार्यालयात ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावीत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सभासदांनी नोंद घ्यावी. प्राप्त झालेल्या अर्जामधून गुणवत्तेनुसार प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक संचालक मंडळाच्या बैठकीत निवडण्यात येतील तसेच ज्या सभासदांच्या पाल्यास इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ६० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा पाल्यांचा संस्थेतर्फे सत्कार करुन प्रशस्तीपत्र देण्यात येतील. पात्र पाल्यांचा सत्कार पतपेढीच्या २४ सप्टेंबर रोजी होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.