
जळगाव मिरर / २६ मार्च २०२३ ।
राज्यातील ठाकरे गट व मुख्यमंत्र्यांची शिवसेनेचे वाद आता वाढताना दिसत आहे. अधिवेशनाचा शेवटचा दिवस संपलेला आहे. तर सत्ताधारीसह विरोधक आमदार आपापल्या मतदार संघात गेले असून आता पुन्हा एकदा शिंदेंच्या आमदारांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड म्हणाले कि, संजय राऊतांना अक्कल पाहिजे, आमच्याकडे पक्ष असताना दुसरा पक्ष काढण्याची गरज काय असा सवाल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा स्वातंत्र पक्ष काढावा आणि निदान किमान पाच आमदार तरी निवडून दाखवावेत असं आव्हान राऊत यांनी दिलं होत. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यांना अक्कल पाहिजे. आम्हाला शिवसेनेसारखा पक्ष असताना दुसरा पक्ष काढायची गरज काय? आम्हाला शिवसेना पक्ष आहे, आम्हाला धनुष्यबाण आहे. आमच्याकडे 50 आमदार 13 खासदार आहेत. हजारो माजी आमदार हजारो नगरसेवक आणि लाखो जनता आमच्या सोबत आहेत. पक्ष काढायची गरज तुम्हाला आहे.