जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय महिला कडपे बदलवीत असतांना घरात घुसून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय महिला दि. १ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास नळाचे पाणी भरल्यानंतर घरामध्ये कपडे बदलवीत होती. यावेळी संशयित आरोपी राजकुमार मिश्रा याने घरात अनधिकृत प्रवेश करीत महिलेसोबत अश्लिल संवाद साधला. तसेच पिडीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात संशयित आरोपी राजकुमार मिश्रा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. फौजदार संगीता खांडरे ह्या करीत आहेत.