
जळगाव मिरर । ८ जानेवारी २०२३
१९९३ मध्ये जसा स्फोट घडला होता तसा स्फोट पुन्हा दोन महिन्यात मुंबईत होणार असा फोन पोलिस कंट्रोलला करण्यात आला आहे. या फोन प्रकरणी मालाडमधून एकाला अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यात मुंबईत 1993 सारखे स्फोट होणार असं या फोन कॉल मधून सांगण्यात आलं आहे.
माहीम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा या फोन कॉलमधून करण्यात आला आहे. तर बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. मुंबई एटीएसने तपास करत एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनवर सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई एटीएसनं हा फोन ज्या व्यक्तीनं केलाय त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.





















