जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रामपेठेतील रहिवासी तथा नगर परिषदेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सुनील भिका भुसांडे (वय ४५) यांचे बुलडाणा येथे एका दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण वरणगावात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुनील भुसांडे हे काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे जात असताना रस्त्यात अपघात झाला होता. या अपघातात सुनील भुसांडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर गत ४ दिवसपासून बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १० ऑक्टोबरलला मृत्यूशी झुंज देतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मयत सुनील भुसांडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली असा परिवार आहे. सुनील भुसांडे हे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. कामाच्या ठिकाणी त्यांची मेहनत, शिस्त आणि सहकार्यामुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनामुळे नगर परिषदेसह परिसरात शोककळा पसरली आहे. उन्नती मित्र मंडळ या सामाजिक संस्थेचे ते सक्रिय सदस्य होते. संस्थेच्या वतीने त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे.



















