जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील नवीन बस स्थानक चौकाला म.बसवेश्र्वर चौक नामकरण सोहळा दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आ.राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला.
म.बसवेश्र्वर यांच्या नावाने शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील चौकास नामकरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य गजाननसर, प्रा.रमेश आवटे, म.बसवेश्र्वर लि. समाज बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष संदीप बसवे, कार्यअध्यक्ष विशाल लिंगायत, सचिव संदीप मिटकरी, समीर गुळवे, पंकज सर्दावते, कृण्णाप्पा गठरी, भुसावल अध्यक्ष सुरेश मानेकर, पियुष देशमुख, निलेश देशमुख, प्रवीण देवऊळकर,उज्वल कानडे, विनायक तोडकर, किशोर वाणी व यावल, भुसावल, फैजपुरसह फत्तेपूर परिसरातून लिंगायत समाजबांधवानी कार्यक्रमाला उपस्थिती दिली होती.