जळगाव मिरर | २८ मे २०२५
शहरातील जोशी पेठ परिसरातील भोई गल्लीत दि.२७ मे रोजी दुपारच्या सुमारास पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असताना घरी एकटेच असलेल्या महेश मुरलीधर मराठे (वय ४०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा पुतण्या बोलविण्यास गेला त्यावेळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेल्समन असलेले महेश मराठे यांची पत्नी मुलीसह माहेरी गेलेली आहे. त्यामुळे महेश हे घरी एकटेच होते. त्यावेळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. त्यांचा पुतण्या बोलविण्यासाठी गेला. मात्र, आतून दरवाजाला कडी लावलेली होती. मोबाइल केला, तरी प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून पाहिले असता, मराठे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यावेळी घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. मराठे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले.




















