देशात सध्या मोठ्या प्रमाणात 5G सुरु झाले आहे. यामुळे प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुद्धा जोरदार चढाओढ पहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jio, Airtel, Vodafone- Idea अशा सर्वच कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणत असतात.
त्याच पार्श्वभूमीवर VI आपल्या ग्राहकांना अवघ्या 45 रुपयांत तब्बल 6 महिने व्हॅलिडिटी असलेला जबरदस्त प्लॅन घेऊन आले आहे. या प्लॅनमुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. चला जाणून घेऊया VI च्या या प्लॅनमध्ये नेमकं काय खास आहे.
VODAFONE IDEA च्या ह्या 45 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिस्ड कॉल अलर्ट सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी तब्बल 6 महिन्यांची आहे. आउट ऑफ कवरेज असताना ज्यांना त्यांच्या फोनवरील कॉलबद्दल जाणून घ्यायचे आहे अशा यूजर्ससाठी हा प्लॅन आहे. जर तुमचा मोबाईल बंद असेल किंवा नेटवर्क एरियाच्या बाहेर असेल, तर तुम्ही या रिचार्ज प्लॅनद्वारे इनकमिंग कॉलची माहिती सुद्धा मिळवू शकता. परंतु 45 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचा कोणताही लाभ तुम्हाला घेता येणार नाही. यासोबतच या प्लॅनमध्ये इंटरनेट सुद्धा वापरता येणार नाही.
BSNL चा 22 रुपयांचा रिचार्ज
BSNL ने सुदधा आपल्या ग्राहकांचे पैसे वाचवण्यासाठी 22 रुपयांचा व्हॅलिडिटी प्लॅन आणला आहे. ज्या ग्राहकांना इंटरनेटची गरज नाही आणि जे जास्त फोन कॉल सुद्धा करत नाही अशा ग्राहकांसाठी BSNL आपला हा 22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेऊन आलं आहे. सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे. त्यामुळे विनाकारण जास्तीचे पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज लागणार नाही.