जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
भारताचे संविधान स्वीकारल्याच्या दिवसाचे औचित्य साधून, आज संविधान दिनानिमित्त जळगाव शहरातील संविधान मंदिर,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव यांच्या वतीने संविधान पूजन आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी भारतीय संविधानाचे महत्व आणि त्यातील मूल्यांचे स्मरण केले. सर्वप्रथम सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या प्रतीचे विधीवत पूजन केले. त्यानंतर, संविधानाची मूळ प्रस्तावना (Preamble) सर्वांनी सामूहिकपणे आणि उत्साहाने वाचन केली. “संविधानातील ‘न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता’ या मूलभूत मूल्यांवर प्रकाश टाकत, प्रत्येकाने संविधानाप्रती निष्ठा ठेवण्याचे आवाहन याप्रसंगी महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी केले. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता वाढण्यास मदत मिळाली.
संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय लोकशाही आणि संविधाना प्रती आदर व्यक्त करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न होता, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. याप्रसंगी महानगर मंत्री चिन्मय महाजन, महानगर सहमंत्री वरद पांढरकर, महानगर सोशल मीडिया प्रमुख गणेश पाटील व इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.





















