
जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२४
देशभरात नवरात्रीचा उत्साह मोठ्या धुमधडाक्यात सुरु असून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली असून चांदीचे दर मात्र वाढले आहेत. बुलियन मार्केट या संकेतस्थळानुसार गुरुवारी २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,८५९ रुपये आहे; तर २४ कॅरेटसाठी ७६, २१० रुपये आहे.
चांदीचे दर मात्र वाढत असून दर प्रतिकिलो ९१,९६० रुपये आहे. त्यात ५१० रुपयांनी वाढ झाली आहे. अर्थात जीएसटी आणि स्थानिक करांमधील तफावतीमुळे वेगवेगळ्या शहरांत सोने-चांदीचे दर वेगवेगळे असू शकतात.
दोन ऑक्टोबर रोजी म्हणजे बुधवारी चांदीचा दर ९१,४५० रुपये प्रतिकिलो होता आणि १० ग्रॅम सोन्याचा दर ७६, ३९० रुपये होता. मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,७६८ रुपये असून २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ६५, ७६२ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९१,८६० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोने ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
विशेष म्हणजे चालू वर्षी चांदीने २९ मे रोजी ९४,२८० रुपये प्रतिकिलोचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर हा दर कमी होत गेला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी हेड अनुज गुप्ता यांच्या मते, येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीचे भाव वाढू शकतात. यंदा सोने ७८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. चांदीही एक लाख रुपये किलोपर्यंत पोहोचू शकते.