जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
खान्देशातील आधुनिक व पारंपरिक वस्त्रालंकारांच्या फॅशनचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश कलेक्शन्स अॅण्ड क्रिएशनमध्ये लग्नसराईनिमित्त डिझायनर व कलात्मक वस्त्रालंकारातील फ्रेश स्टॉकची नावीन्यपूर्ण श्रृंखला ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. दालनात अद्वितीय वस्त्रांच्या महाडिस्प्लेसह सेल्फ सर्व्हिसचा आनंद ग्राहकांना मिळत आहे.
छत्रपती शिवाजीनगर परिसरातील राधाकृष्ण नगर चौकाजवळ ८० फुटी कानळदा रिंग रोडस्थित ‘सुरेश कलेक्शन्स अॅण्ड क्रिएशन’च्या वातानुकूलित, दालनात लग्नाच्या बस्त्यासाठीच्या विशेष व्यवस्थेत लग्नाच्या शॉपिंगसाठी मुंबई, जयपूर, कोलकत्ता, इंदूर, सुरत, बनारस, बंगळुरू व अन्य ठिकाणची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. नवीन फ्रेश व मनमोहक रंगसंगतीतील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रांची श्रृंखला ग्राहकांच्या आवडी- निवडी जोपासत अगदी सामान्यांपासून ते उच्चभ्रू वर्गासाठी आप-आपल्या बजेटप्रमाणे वाजवी दरांमध्ये उपलब्ध आहे.
प्रत्येक धर्मपंथानुसार, वर- वधूंपासून ते पाहुणेमंडळीपर्यंत, वस्त्रालंकार उपलब्ध आहेत. साखरपुडा, प्री-वेडिंग, फोटोशूट, हळद, लग्नसोहळा, रिसेप्शनसह वेगवेगळ्या रंगसंगतीतील पेहराव आहे. तसेच सुटिंग, शर्टिंग, टी-शर्ट्स व शर्ट्स, जीन्स व ट्राउझर्स, कुर्ता-पायजमा, मोदी जॅकेट, शेरवानी, ब्लेझर, सूट, जोधपुरी यासह साडी (कॉटन व फॅन्सी), डिझायनर साडी, पैठणी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साड्या, वन पीस व क्रॉप टॉप, घागरा-ओढणी, लेडीज रेडिमेड पंजाबी सूट, यासह स्पेशल ब्रायडल कलेक्शन उपलब्ध आहे. ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी, असे संचालक मुकेश हासवाणी यांनी कळविले आहे.