
मेष : घरातील ज्येष्ठांचा आदर करा. राजकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळेल. महिलांसाठी आजचा दिवस विशेष शुभ आहे. मात्र पैशाच्या व्यवहाराशी संबंधित काही वैयक्तिक संबंध खराब होऊ शकतात, याची जाणीव ठेवा. व्यवसाय क्षेत्रातील कागदपत्रांच्या कामात पूर्ण पारदर्शकता राखा. पती-पत्नीमध्ये सहकार्याचे नाते राहील.
वृषभ : आज कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जावून घेवू नका. जवळच्या नातेवाईकांशी मालमत्तेबाबत चर्चा होऊ शकते. तुमचा राग आणि हस्तक्षेप कुटुंबातील सदस्यांसाठी त्रासदायक ठरु शकतो. स्वभावात सकारात्मकता ठेवा. तणावामुळे तुमची काही कामे अपूर्ण राहू शकतात. कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. वाहन खरेदीसाठी आजची वेळ योग्य आहे. विद्यार्थी त्यांचा कोणताही प्रकल्प पूर्ण करून तणावमुक्त होतील. घरातील वातावरण शांत ठेवायचे असेल तर बाहेरच्या व्यक्तीला घरात ढवळाढवळ करू देऊ नका. सार्वजनिक व्यवहार मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नीच्या परस्पर सहकार्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. रक्तदाबाची समस्या असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी.
कर्क : जनसंपर्काची व्याप्ती वाढेल. समाजात आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये विशेष स्थान असेल. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्या. घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक आहे.
सिंह : आज तुम्ही बहुतांश वेळ आवडीच्या कामांमध्ये व्यतित कराल. सामाजिक कार्यातही तुम्हाला विशेष रस असेल. घरात शिस्तबद्ध वातावरण राहील. ताप, खोकला यासारख्या समस्या जाणवतील.
कन्या : तुम्ही मेहनतीने परिस्थिती अनुकूल कराल. विरोधक पराभूत होतील. अपेक्षापूर्तीसाठी अयोग्य काम करू नका, अन्यथा तुमची बदनामी होऊ शकते. पती-पत्नीच्या सहकार्यामुळे वातावरण व्यवस्थित राहील. सौम्य हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.
तूळ : आज इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्यास आज अनेक समस्या दूर होतील. नातेवाइकांशी संबंधित कोणताही वाद मिटून नाते पुन्हा गोड होईल. प्रवास टाळा. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. कामाच्या ठिकाणचा ताण कुटुंबावर पडणार नाही याची दक्षता घ्या. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : सकारात्मक विचार तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करतील. काही खास लोकांच्या संपर्कात आल्याने तुमची विचारशैली आश्चर्यकारकपणे बदलेल. आपल्या भविष्यातील योजनांवर उघड चर्चा करु नका. व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.
धनु : आज तुमचा शहाणपणाचा निर्णय तुमची आर्थिक बाजू मजबूत करेल. जवळच्या नातेवाइकांसोबत कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःहून घ्या. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. रक्तदाब, मधुमेह असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी.
मकर : सर्व कार्ये व्यवस्थित आणि समन्वित पद्धतीने केल्याने तुम्हाला आश्चर्यकारक यश मिळेल. आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित बाबींवर अधिक लक्ष द्या. तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या प्रकृतीची चिंता राहील. कार्यक्षेत्रात कोणाशीही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. आहारावर नियंत्रण ठेवा.
कुंभ : कर्मावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी विशेषतः शुभ असेल. राजकीय, सामाजिक कार्यातही तुमचा वेळ जाईल. एखादी छोटीशी समस्या घरात मोठी समस्या बनू शकते. बाहेरच्या व्यक्तीला घरात ढवळाढवळ करू देऊ नका. वाहन जपून चालवा.
मीन : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. काही काळापासून सुरू असलेल्या समस्या योग्य प्रकारे सुटतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. अतिआत्मविश्वास टाळा. जवळच्या मित्र किंवा नातेवाईकांमुळे मनस्ताप होईल. जोडीदाराचा पाठिंबा तुमचे मनोबल उंचावेल. चुकीच्या आहारामुळे पोट खराब होऊ शकते.