जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
राज्यात गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असून येत्या काही दिवसात नवरात्र व त्यापाठोपाठ दिवाळी येत आहे पण सध्या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरातील घसरण कायम आहे. आज देखील सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 56,561 रुपये प्रति तोळ्यावर उघडला आहे. काल म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर 56,653 रुपये प्रति तोळे किंमतीवर बंद झाला होता.
सोन्याच्या दराच्या कालच्या तुलनेत आज 92 रुपयांची घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर मागील 5 दिवसात सोन्याच्या दरात जवळपास 1000 रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याच्या किंमतीने 11 मे 2023 रोजी आजवरचा उच्चांक दर गाठला होता. त्यादिवशी सोन्याची किंमत तब्बल 61585 रुपये प्रति तोळे होती. सोन्याच्या आजच्या दराची उच्चांकी किमतीशी तुलना केली तर सोने सध्या जवळपास 5000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण सुरुच आहे. चांदी सध्या आपल्या उच्चांक दरापेक्षा 9047 रुपयांनी स्वस्त विकली जात आहे. आज चांदीचा दर प्रति किले 67417 रुपयांवर उघडला आहे. आज चांदीच्या दरात 29 रुपयांची घसरण झाली आहे.
- मुंबई – 57160 रुपये / प्रति तोळे
- पुणे – 57160 रुपये / प्रति तोळे
- ठाणे – 57160 रुपये / प्रति तोळे
- नागपूर – 57160 रुपये / प्रति तोळे
- नाशिक – 57190 रुपये / प्रति तोळे
- सोलापूर – 57160 रुपये / प्रति तोळे
- छत्रपती संभाजीनगर – 57160 रुपये / प्रति तोळे