जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२५
संत ज्ञानेश्वरांच्या अमृतवाणीतून समाजात भक्ती, नैतिकता आणि सेवा भाव जागृत ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे. पारायणासाठी दररोज मोठ्या संख्येने महिला पारायण बसून सहभाग घेत आहेत.
या पारायण सप्ताहातील विशेष उपक्रमांतर्गत आज आमदार राजू मामा भोळे व मा. महापौर ज.श.म.न.पा सौ.सीमाताई भोळे यांच्या हस्ते पारायण बसलेल्या महिलांना पैठणी वाटप करण्यात आले. प्रत्येक लाभार्थी महिलेच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची झळाळी पाहायला मिळाली.
या प्रसंगी आमदार राजू मामा भोळे म्हणाले, “ज्ञानेश्वरी पारायण ही आपल्या अध्यात्मिक परंपरेची अमूल्य देण आहे. पारायणासाठी वेळ देणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.” पैठणी वितरित करताना सौ.सीमा ताई भोळे यांनी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. पारायण सप्ताहात धार्मिक कार्यक्रमांसोबतच घेतलेले असे सामाजिक उपक्रम भक्तांच्या मनाला स्पर्श करणारे ठरले असून, आयोजक मा.नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक व सौ.अर्चनाताई प्रशांत नाईक यांनी आमदार दांपत्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले




















