मेष : आज तुम्ही आव्हानात्मक परिस्थितीला कठोर परिश्रमाद्वारे तोंड देण्यास सक्षम असाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबाशी चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणाशी सौम्य मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका.
वृषभ : आज दिवस अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विशेष कौशल्यांचा गौरव करण्यात चांगला व्यतित कराल. नातेवाईकांशी संवाद साधाल. विद्यार्थी आपल्या ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करतील. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त असेल. व्यावहारिक होऊन तुमची कामे पूर्ण करा. उधार घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे. नकारात्मक गोष्टींना वर्तमानात वरचढ होऊ देऊ नका. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे पाठबळ लाभेल. आरोग्य चांगले राहिल.
कर्क : सध्याच्या दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. घरातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.
सिंह : : आज तुम्ही तुमच्या मेहनतीने परिस्थिती अनुकूल बनवू शकता. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहिल.
कन्या : महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः अनुकूल आहे. स्वक्षमतेवर आणि प्रतिभेच्या जोरावर कोणतेही विशेष ध्येय साध्य करू शकाल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होईल. महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. वैवाहिक संबंध मधुर राहतील.
तूळ : नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून अनेक गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडाल. संपर्कक्षेत्र मजबूत होईल. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास मोठा दिलासा मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहिल.
वृश्चिक : दिवसाचा बराचसा वेळ आध्यात्मिक कार्यात जाईल. मानसिक शांतीही मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याने त्यांचे मनोबल वाढेल.
धनु : तुमच्या कौटुंबिक समस्येत बाहेरील व्यतीला ढवळाढवळ करु देवू नका. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे घरबसल्या पूर्ण करता येतील. आरोग्य उत्तम राहील.
मकर : तुमचा बहुतांश वेळ आवडीच्या कामात व्यतित केल्याने तुमच्यात नवीन ऊर्जा होईल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत योग्य मानसिक संतुलन राखाल. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : सामाजिक सेवा संस्थेबद्दल सहकार्याची भावना दृढ होईल. तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल.जवळचा नातेवाईक किंवा मित्र ईर्षेमुळे तुमची छाप खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींचा अधिक विचार करावा लागेल.
मीन : जवळच्या नातेवाईकाशी एखाद्या विशेष विषयावरील चर्चा लाभदायक ठरेल. इमारत बांधकामाशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल, तर आज तुम्ही त्यासंबंधी कोणतीही महत्त्वाची योजना किंवा निर्णय घेऊ शकता. कार्यक्षेत्रात अधिक समज आणि दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे.