जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
रावेर येथील कल्याणी हॉटेल समोर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून गावठी कट्टयाससह अटक केली आहे. बुऱ्हाणपुर येथील हद्दपार आरोपी गैरकायदा गावठी बनावटी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस हस्तगत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ रोजी सहा.पो नि. अशिष अडसुळ यांना गुप्त माहिती मिळाली की, रावेर शहरातील बुऱ्हाणपुर रोडने कल्याण बियर बार समोर एक तरूण अंदाजे वय २५ ते ३० वय, अंगात निळसर रंगाचा शर्ट व राखाडी काळ्या रंगाची जीन्स पँन्ट व गळ्याभोवती फिक्कट लाल भगवा रंगाचा लांब रूमाल असलेला हा त्याचे ताब्यात एक गावठी कट्टा घेवुन येणार आहे. माहीती मिळताच पोउनि श्री. सचिन नवले यांनी सर्व सहकारी पो स्टे येथुन संध्याकाळी ६ वाजेच्या तुमारास वा खाजगी वाहनाने कल्याणी हॉटेलच्या काही अतंरावर वाहने उभे करून तेथुन पायी चालत कल्याणी हॉटेल्याच्या आजु बाजुला दबा लावुन बसले असतांना वरिल वर्णनाचा तरूण पोलीसांना दिसला त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव मुजाहिद उर्फ माया ईब्राहम खान (वय २७) रा गु लाबगंज, लालबाग, बुऱ्हाणपुर, ाध्यप्रदेश असुन पोउनि सचिन नवले यांनी पंचासमक्ष त्याची अगंझडती घेता त्याचे कमरेला पोटासमोरील बाजुस लावलेला एक गावठी कट्टा व पँटच्या डाव्या खिश्यात ०२ पितळे राऊंड मिळुन आले.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशिष आडसुळ, पोउनि सचिन नवले, पोहेकाँ ईश्वर चव्हाण, पो काँ सचिन घुगे, पो काँ विशाल पाटील, पो कॉ प्रमोद पाटील, पो काँ महेश मोगरे अशांनी केली असुन पुढील तपास पोउनि सचिन नवले करीता आहे.