जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील किराणा दुकान व गोदामांवर एमआयडीसी पोलिसांनी दि. १२ जानेवारी रोजी शुक्रवारी छापेमारी केली असता विक्रीसाठी तंबाखू पान मसाला साठवून ठेवला होता. यावर कारवाई केली आहे. या कारवाईत याठिकाणाहून २ लाख ४४ हजार ६८६ रुपयांचा तंबाखू पान मसाला जप्त केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील गोदामासह किराणा दुकानात तंबाखू पान मसाला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर सचिन विसपुते यांच्यासह अन्य पोलिसांचे पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी सिंधी कॉलनीतील दुकान व गोदामा छापेमारी करीत पाहणी केली. यामध्ये गोदामामध्ये ९२ हजार ८९२ रुपयांचा तंबाखू पान मसाला आढळून आला. त्यासोबतच खुशी किराणा दुकानात एक लाख ५१ हजार ७९४ रुपयांचा तंबाखू पान मसाला आढळून आला. या प्रकरणी पोकॉ किरण पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल त्यावरून रमेश चेतवाणी, दीपक चेतवाणी, सिमरण चेतवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही जण फरार झाले. पुढील तपास पोउनि दत्तात्रय पोटे करत आहेत.