जळगाव मिरर | ७ जुलै २०२३
राज्यात आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी गौतमी पाटील सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर गौतमीचं चर्चेत असण्याचं कारण हे कधी तिचा डान्स नाही तर तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील आहेत.
काही दिवसांपूर्वी गौतमीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती. गौतमी ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे कळल्यापासून गौतमीच्या सगळ्याच चाहत्यांना आनंद झाला असून तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तर आता या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी गौतमीच्या ‘घुंगरू’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तो ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची आतुरता वाढली. या ट्रेलरमध्ये गौतमीच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. पण या सगळ्यात आता अशी बातमी समोर आली आहे की गौतमीच्या या ‘घुंगरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या उत्सुकतेचा कोणाची नजर लागली असं म्हणायला हरकत नाही. तर आता प्रश्न असा आहे की गौतमीचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? त्याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते बाबा गायकवाड यांनी सांगितले आहे. बाबा गायकवाड म्हणाले की “सध्याची राज्याची राजकीय परिस्थिती पाहता पुढच्या आठ दिवसात चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात येईल. याविषयी बोलताना पुढे बाबा गायकवाड म्हणाले, “तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरला जाऊन सर्वांनी पाहावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे”.या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्याचं शूटिंग हे सोलापूर, माढा, हंपी आणि परदेशातही झालं आहे.