जळगाव मिरर | १२ नोव्हेबर २०२३
देशभरातील प्रत्येक नागरिक आज आज दिवाळी साजरी करीत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून यंदा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या खनूरमध्ये लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील दहा वर्षांपासून सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत “देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो,” असे लिहिले आहे.
पंतप्रधानांनी 2014 मध्ये सियाचीन ग्लेशियर, 2015 मध्ये पंजाबमधील अमृतसर, 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर आणि 2017 मध्ये काश्मीरमधील गुरेझ येथे 2018 मध्ये, पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आणि 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरीमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर 2020 मध्ये पंतप्रधानांनी राजस्थानमधील जैसलमेर, 2021 मध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशहरा आणि 2022 मध्ये कारगिलमध्ये दिवाळी साजरी केली होती. यंदा जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथील झोरियन येथे भारतीय लष्कराच्या 191 ब्रिगेडसोबत दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंतप्रधान बीएसएफ जवानांसोबतही दिवाळी साजरी करणार आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.