जळगाव मिरर | ९ मे २०२४
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पदयात्रे दरम्यान, स्मिताताईंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी “अबकी बार मोदी सरकार “ या घोषणांनी शहरातील प्रत्येक भाग दणाणून सोडला. स्मिताताईंनी पदयात्रेत सामील नागरिकांशी संवाद साधत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले .
यावेळी माजी खासदार ए.टी. नाना पाटील, अमोलदादा चिमणराव पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, मच्छिन्द्र बापू पाटील, रमेशभाऊ परदेशी, वासुदेव पाटील, उज्वलाताई पाटील, रवीभाऊ जाधव, राजाभाऊ पाटील, परेश पाटील, सुनील पाटील, अतुल पवार, सचिन पानपाटील, ज्ञानेश्वर आमल, डॉ. नरेंद्र ठाकूर, कुणाल महाजन, निलेश परदेशी, मनोज पैलवान, जगदीश ठाकूर, समाधानभाऊ पाटील, बबलू पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, कुणाल पाटील, पिंटूभाऊ राजपूत, शामभाऊ ठाकूर, अमर राजपूत, सचिनभाऊ विसपुते, नितीन नाना महाजन, विवेक ठाकूर, योगेश महाजन, केतन सोनी, मायर ठाकूर, आनंद दाभाडे, छायाताई दाभाडे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, विशाल सोनार, अभिजित पाटील, आनंदा चौधरी, शालीक गायकवाड, मयूर महाजन, सुभाष पाटील यांसोबत महायुतीचे कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव शहरातील वाघनगर भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या एकूण लवकरात लवकर निरसन करण्याचे आश्वासन दिले.
आमदार राजूमामा भोळे, आमदार उमाताई खापरे, संतोष आप्पा पाटील, उज्वलाताई बेंडाळे, विशाल त्रिपाठी, अर्चनाताई उहेनकर, सरिताताई माळी, सायलीताई साठे, सुजाता निंबाळकर, अनिलदादा अडकमोल, राजेंद्र घुगे पाटील, मिलिंदभाऊ पाटील, रेखा वर्मा, बापू कुमावत, पियुष कोल्हे, विनोदभाऊ देशमुख, विजय वानखेडे, उमेश सोनावणे, दीपक पाटील, अजित राणे, राहुल मिस्त्री, विनोद मराठे, करीम शेख, वैशाली पाटील, सुरेख तायडे, जयश्री पाटील, ममता तडवी, भाग्यश्री चौधरी, सविता भोळ, कुंदन काळे, रेखा कुलकर्णी यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.