जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२
जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा प्लाझाला गांधी चित्रपट लागला होता. कॉलेजच्या काळात पहिल्यांदाच असा मनात आला की एवढी भव्य चित्रपट शिवाजी महाराजांवर यायला हवा. त्यानंतर मी वाचायला सुरुवात केली. नंतर लक्षात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही. कारण ती खूप मोठी गोष्ट आहे. मी त्याविषयी अनेकांना विचारणाही केली होती. मात्र आता आपण स्वत: महाराजांवर चित्रपट काढण्याची विचार करतो आहोत. अशी घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मुलाखतीमध्ये राज यांनी आपल्या चित्रपट विषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज म्हणाले, हर हर महादेव हाच चित्रपट का, मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता तो 2003 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ती अचानक जबाबदारी माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे हे माझे काम नाही. मी त्याचा कधीही विचार केला नाही. 2004 मी शिवसेनेचे कॅम्पेन केले होते. त्या 9 फिल्म्सचा आवाज अजित भुरे यांचा होता. मुंबईवरील बॉम्बस्फोटाच्या एका अॅड फिल्मला माझा आवाज होता. फिल्म झाली बाळासाहेबांना त्या आवडल्या.
चित्रपट बनवणे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मला तो आवडला तो मी वेगवेगळ्या अँगलनं पाहिला आहे. गांधी हा चित्रपट मी किती वेळा पाहिला असेल मलाच माहिती नाही. यावरुन माझी पत्नी मला नेहमीच टोकते. चित्रपटाची मला आवड आहे. चित्रपट हा एक सामुहिक सहभागाचा प्रयत्न असतो. खूप लोकांचे कष्ट असतात. त्या सगळ्या प्रयत्नांपैकी व्हाईस ओव्हर हा एक भाग आहे. तो काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मी व्हाईस ओव्हर आहे.





















