जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२३
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी एकत्र येत मोठी राजकीय उलथा – पालथ राज्यात केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गोप्यस्फोटाने पुन्हा राजकीय नाट्य रंगले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील एका क्लबमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मला भारतीय जनता पार्टीकडून युतीची ऑफर मिळाली आहे. पण मी त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या स्थितीत एकनाथ शिंदे व अजित पवार हे भाजपसोबत असल्याने ते अजित पवार यांचे काय करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युतीचे नेमके गणित कसे असणार यावरही संभ्रमावस्था असल्याने त्यामुळे मी तुर्त अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही.
अखेर मनसेची रणनीती ठरली
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरात कामाला लागली असून त्यासाठी आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची रणनीती मनसेने तयार केली आहे मनसेने १ लोकसभा संघटक व ११ पदाधिकाऱ्यांची टीम देखील तयार करून कामाला लावले आहे तर बारा जणांची टीम प्रत्येक मतदारसंघात जाऊन जन्मताच कानोसा घेणार असून त्याचा अहवाल पक्षाला सादर करणार आहे त्यानंतर या मतदारसंघात अध्यक्ष राज ठाकरे दोन दौरे व चार सभा घेण्याचा देखील अंदाज वर्तविला जात आहे
