जळगाव मिरर / २२ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिसांनी सन 2017 मध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करत संशयित आरोपीला वाराणसी येथून ताब्यात घेत १० तोळे सोने जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.30 मार्च 2017 रोजी फिर्यादी नामे सचिन वसंतराव भामरे रा.आर एल कॉलनी गांधी नगर जळगाव यांचे पिंप्राळा परीसरातील सोमाणी मार्केट येथील साई ज्वेलर्स या दुकानातील कामगार नामे सुशांत सुनिल कुंडु याने दागिने बनविण्यास दिलेल्या एकुण 30 तोळे वजनाच्या सोन्याचा अपहार करुन त्यांचे मुळ गावी पश्चिम बंगाल येथे पलायन केले होते. त्यावरुन फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन रामानंद नगर पोस्टेस गुरनं 42/2017 भादवि कलम 408,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल इ गालेनंतर आरोपीताचा त्याचे मुळ गावी पोलीसांनी वेळोवेळी शोध घेतला असता तो मिळुन आलेला नव्हता करीता सदरचा गुन्हा हा कायम तपासवर ठेवण्यात आला होता.
संशयित आरोपीतास वाराणसी उत्तर प्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपी नामे सुशांत सुनिल कुंडु वय-39 रा.नस्कर पारा, संत्रागाच्छी, जिला हावडा, पश्चिम बंगाल यास पोस्टेस हजर करुन दि. 13/10/2025 रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सपोनि भुषण कोते यांनी पुढे सुरु ठेवला असता आरोपीताकडुन कलकत्ता पश्चिम बंगाल येथुन सुमारे 11 लाख 90 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय भूषण कोते, हवालदार जितेंद्र राजपूत, पोलिस नाईक. योगेश बारी, अनिल सोननी, अतुल चौधरी यांनीही कारवाई केली आहे.
