
जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२४
दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने नरेश पांडुरंग पवार (वय ४२, रा. रामेश्वर कॉलनी) यांना एकाने लाकडी बॅटने बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास मंगलपुरी भागातील हनुमान मंदिराजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीत नरेश पवार हे वास्तव्यास असून ते चटई कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीस आहे. दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते मंगलपुरी भागातील हनुमान मंदिराजवळून घराकडे जात होते. यावेळी रवी जाबर हा त्यांना रस्त्यात भेटला. त्याने नरेश पवार यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे असे असे म्हणू लागला. मात्र पवार यांनी त्याला दारु पिण्यास पैसे न दिल्याने त्याने त्यांच्यासोबत झटापट करण्यास सुरुवात केली.
यावेळी लाकडी बॅटने नरेश पवार यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या डोळ्याच्या खाली आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच या झटापटीमध्ये पवार यांच्या खिशातून मोबाईल खाली पडून नुकसान झाले आहे. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रवी जाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.