जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२३
आज पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमती आज 1 सप्टेंबर रोजी अपडेट केल्या आहेत.
ज्यामध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 157 रुपयांनी कमी झाली आहे. या बदलानंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 1522.50 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी या वाढीसह व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 4 जुलै रोजी 1780 रुपयांवर पोहोचली होती.
मंगळवारी एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी झाली. सरकारच्या या नव्या निर्णयानंतर एलपीजी सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत मोठा बदल झाला आहे. आता देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 903 रुपयांना विकले जात आहे. आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा 200 रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळू लागले आहेत.
