जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२४
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या अनेक वर्षापासून विकासकामे होत नव्हते मात्र काही ठिकाणी निधी आला असताना नवीन उड्डाणपूल ते जुना कानळदा रोड या ८० फुटी रस्त्यावर भरपावसात सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू असून यावर मात्र मनपाचे अधिकारी केवळ बघायची भूमिका घेत आहेत. या ठेकेदारावर कुठलीही कारवाई न करता रस्त्याचे तीन-तेरा करून टाकले आहे.
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नवीन उड्डाणपूल ते जुना कानळदा रोड या ८० फुटी रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून सिमेंट काँक्रिटीकरण काम बंद व चालू परिस्थितीत होते. मात्र गेल्या तीन दिवसापासून जळगाव शहरात पाऊस सुरू असताना देखील या रस्त्याचे काम सुरू आहे. आधीच हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविला जात असून त्यात आणखी भर पावसात बनवीत आहे. परिसरातून जाणारे नागरिक त्या ठेकेदाराच्या माणसाला प्रश्न केला असता ठेकेदाराचा माणूस एका नगरसेवकाचे नाव सांगत होता. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. जर प्रभागातील रस्ते खराब होत असतील तर यावर नागरिक बोलणार कि नगरसेवक लक्ष ठेवणार. याच रस्त्यावरून मनपाचे अधिकारी देखील गेले मात्र त्यांनी पावसात काम सुरू असताना देखील कुठलीही चौकशी न करता त्या ठिकाणाहून निघून गेले त्याला जबाबदार कोण. याचा अर्थ असा की जळगाव शहरातील ज्या ठिकाणी रस्ते होत असतील ते खराब जरी होत असले त्यावर मनपाच्या अधिकाऱ्यांचे कुठल्याही ठेकेदारावर नियंत्रण नाही. नियमित पाहणी देखील अधिकाऱ्यांची होत नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील सर्वच विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जा सुरू असल्याचे देखील दिसून येत आहे. तरीदेखील या कामांवर मनपाचे अधिकारी कारवाई करत नसल्याने यामध्ये नक्कीच टक्केवारीचे राजकारण सुरू आहे का असा थेट आरोप नागरिक करू लागले आहे. (भाग १)