जळगाव मिरर | १० मार्च २०२५
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोगाच्या अध्यक्ष करत असतात, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली. पुण्यासह राज्यभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने रोहिणी खडसे यांच्या नेतृत्त्वात पुण्यात आंदोलन करण्यात आले, या वेळी त्यांनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, पोलिसा यंत्रणा कडक कारवाई का करत नाही? महिला अत्याचार झाल्यावर त्यांना अत्याचार सहन करावा लागत आहे. कारवाईला उशीर होत आहे. अनेक वर्षी न्याय मिळत नाही. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढेच काम महिला आयोग आणि राज्याच्या महिला अध्यक्षा करत आहेत. त्या कुठल्या एका पक्षाच्या नाहीत, असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला आहे.
महिला अत्याचार पुण्यात घडत आहेत. पुणे तिथे काय उणे आधी म्हणायचे मात्र आता मी तिथं गुन्हेच गुन्हे होत आहेत. रोज पुण्याचे आता गुन्हे नाव करून द्यायला कायम होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलाही जिल्हा राहिलेला नाही. अत्याचाराच्या घटनांची आमच्या आंदोलनाच्या माध्यमातनं सरकारकडे एकच मागणी आहे की शेवटी जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला आहे. त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती. तो शक्ती कायदा तीन साडे तीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे. तो का मंजूर केला गेला नाही, असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला आहे.