एक काळ होता कि अनेक कोपऱ्याच्या जागी नेहमी प्रेमीयुगुलांचा वावर होता पण सध्या सोशल मिडीयाच्या युगात प्रेमीयुगुल कुणाला ही न घाबरता आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी स्पेशल कसे असेल याचा प्रयत्न करीत असतात पण अशेच प्रयत्न कधी कधी अंगलट येत असतात.
नेहमीच सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ धुमाकूळ घालत असतांना प्रेमी युगुलांचा भररस्त्यात रोमांन्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. आपण कुठे आहोत काय करतोय याचं जराही भान या दोघांना नाहीये. हायवेवर स्पीडमध्ये दुचाकीवर एका तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारून बसले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर प्रवाशांसह नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
सड़को पर आशिकी का सिलसिला जारी है, हापुड़ के NH 9 की थाना सिंभावली में का यह वीडियो है बाकी ट्रैफिक नियमो का क्या? वो तो चलते रहेंगे। pic.twitter.com/FP4FRQLwiV
— Priya singh (@priyarajputlive) October 10, 2023
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी याबाबत अॅक्शन घेण्यास सुरूवात केलीये. जोडप्याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रमी जोडप्याने अशा पद्धतीने भररस्त्यात एकमेकांना मिठी मारल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण हायवेवर तरुण दुचाकी चालवत असताना चित्रपटातील सिन म्हणाने तरुणीने त्याला मिठी मारलीये. अशा तरुणांमुळे वाहन चालवताना त्यावर त्यांचे पूर्ण लक्ष नसते.
