जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२३
देशभरात आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. तर राज्याच्या राजकारणात आज देखील एकमेकावर टीका टिपणी करून राजकारण रंगत आहे. नुकतेच संजय राऊत यांनी अजित पवारांसह शिंदे गटावर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे.
आ.मिटकरी म्हणाले कि, संजय राऊत यांची अवस्था आता पोपटासारखी झाली असून मिटकरी यांनी खेळातील पोपट दाखवत संजय राऊतांवर टीका केली आहे. तसेच सर्वांचा नाद करा पण अजितदादांचा नाद करू नका असा निशाणा मिटकरी यांनी साधला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी अमोल कोल्हे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांची अवस्था पोपटासारखी झाली असल्याचा आरोप करत खेळण्यातला पोपट दाखवून मिटकरी यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, मिटकरी म्हणाले, हे दोन्ही दोघेही खासदार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. यातच अजितदादांच्या व्यक्तिमत्व अधोरेखित होते. कोल्हेंनी आपला पक्ष का सोडला हा प्रश्न स्वतः ला विचारा ते आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षात आल्यानंतर अजित पवारांच्याच पाठबळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. आज काहीतरी लोकांना मनोरंजन करण्यासाठी ज्या काही तुमच्या शाळा भरवल्या जात आहेत. यावर महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवून आहे. तुमच्या दिल्लीश्वराला मी समजू शकतो तुम्ही सर्वांचा नाद करा पण अजित पवारांचा नाद करू नका”, असा सल्ला वजा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार संजय राऊत आणि खासदार अमोल कोल्हे यांना दिला आहे.