जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४
आगामी लोकसभा निवडणुकीची देशभर धामधूम सुरु असतांना वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून मविआपासून वंचित बहुजन आघाडी दूर झाल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसर्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, राज्यात अत्यंत चुरस निर्माण झालेल्या रावेर लोकसभेसाठी वंचितने संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ब्राह्मणे यांची उच्चशिक्षीत अभियंता म्हणून ओळख आहे. ब्राह्मणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.
असे आहेत उमेदवार
हिंगोली – डॉ. बी.डी चव्हाण
लातूर – नरसिंहराव उदगीरकर
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड
माढा – रमेश बारस्कर
सातारा – मारुती धोंडीराम जानकर
धुळे- अब्दुल रहेमान
हातकणंगले- दादासाहेब चवगौंडा पाटील
रावेर- संजय पंडित ब्राम्हणे
जालना- प्रभाकर बकले
मुंबई उत्तर मध्य- अब्दुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- काका जोशी
अशा 11 उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली असून त्यात विविध जातीधर्मातील लोकांना स्थान देण्यात आले आहे.