जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
क्रीडा व युवक सेवा संचालनालय क्रीडा परिषद पुणे,जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत आयोजित शालेय नाशिक विभागीय तायक्वांदो स्पर्धा २०२३ या मधे पोलिस स्पोर्ट्स कराटे अकॅडमीच्या ४ खेळाडूंची निवड शालेय नाशिक विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे त्यात विजय संपादन करून खेळाडूंनी आपली कला कुसर वापरून प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले आहे.
विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे
वयोगट १७ वर्षे आतील मुली
साक्षी बाविस्कर ३२ किलो प्रथम क्रमांक
दिशा वाघ ५२ किलो प्रथम क्रमांक
वयोगट १९ वर्षे आतील मुली
गुंजन ब्राह्मणकर ४२ किलो प्रथम क्रमांक
वयोगट १९ वर्षे आतील मुले
प्रथमेश वाघ ६८ किलो प्रथम क्रमांक
विजयी सर्व स्पर्धकांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज. कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलिस अधीक्षक जळगाव भाग संदीप गावित ,पोलीस उपअधीक्षक गृह रामकृष्ण कुंभार, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,वेल्फेअर पी.एस.आय. रेश्मा अवतारे ,रावसाहेब गायकवाड,यांनी शुभेच्छा दिल्या तसेच खेळाडूना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/जंजाळे,जागृती काळे ,राजेंद्र जंजाळे यांचे मार्गदर्शन लाभले.