• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : ओबीसी नेते वाघमारेंची चारचाकी पेटवली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 22, 2025
in क्राईम, राजकीय, राज्य
0
खळबळजनक : ओबीसी नेते वाघमारेंची चारचाकी पेटवली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२५

गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठे वादंग सुरु असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची कार पेटवून देण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील नीलमनगर भागात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती हे कृत्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मुद्यावरून वातावरण तापले असताना ही घटना घडली आहे हे विशेष.

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद पेटले आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे दोन्ही समाजातील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचले असताना नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार फोडल्याची घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नवनाथ वाघमारे यांची कार सोमवारी रात्री जालना शहरातील नीलम नगर भागात उभी होती. तेव्हा रात्री 11 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिली.

सुदैवाने गाडीत कुणीही नव्हते. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी आरडाओरड केली. तसेच गाडीवर पाणी टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एक अज्ञात व्यक्ती कार पेटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर नवनाथ वाघमारे यांनी याविरोधात जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. अज्ञात व्यक्तीने गाडी जाळण्याचा प्रयत्न का केला? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. पण या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

दुसरीकडे, नवनाथ वाघमारे यांनी या घटनेसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांना जबाबदार धरले आहे. माझी गाडी जाळणे हा मनोज जरांगे समर्थकांचा कट असून यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. गाडी जाळल्याप्रकरणी मनोज जरांगे, शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

Related Posts

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !
क्राईम

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group