जळगाव मिरर | २१ जुलै २०२४
राज्यातील पुणे शहरात भाजपचे महाअधीवेशन सुरु असून या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. यावेळी गृहमंत्री शहा यांनी थेट शरद पवारांवर निशाना साधला आहे.
गृहमंत्री शहा म्हणाले कि, विरोधक आमच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, पण भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार हे शरद पवार आहेत, त्यांनीच भ्रष्ट्राचाराला संस्थात्मक करण्याचे काम केले, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला.
अमित शहा पुढे बोलताना म्हणाले की, या बैठकीतील माझे शब्द लक्षात ठेवून घरी जा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचंड बहुमतामध्ये महायुतीचे सरकार बनेल. अन् हे सरकार भाजपच्याच नेतृत्वाखालीच बनेल, असा दावा त्यांनी केला. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 2014 ते 2024 या काळातील तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केले आहे. परंतु काही लोकांना अपयश आले तरी देखील राहुल गांधी यांच्यात अहंकार आला आहे. जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारीपणाने वावरत आहेत.